शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वार्ता|

लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन् शहीद

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून ओलिसांची सुटका करण्यासाठी मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांनी प्राणाची बाजी‍ लावली असून त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे.

40 तासांपासून संघर्षात आतापर्यंत एका लष्करी अधिकार्‍यासह 14 पोलीस कर्मचार्‍यांनी प्राण गमावला आहे. दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरगती प्राप्त झाल्याचे एनएसजीचे महासंचालक शंभूराज यांनी सांगितले. मेजर उन्नीकृष्णन् कर्नाटकचे आहेत. हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्याचा पाठलाग करत असताना ते गंभीर जखमी झाले होते.