बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (11:39 IST)

मुंबईतील वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला आग, 4 जखमी

मुंबईतील वर्सोवा भागामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट होत आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे. जखमींना कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
गॅस सिलेंडरच्या गोदामाला सकाळी अचानक भीषण आग लागल्याच्या काही क्षणातच आगीचा भडका उडाला. अजून एकापाठोपाठ सिलेंडरचा भीषण स्फोट होत आहे. 
 
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.