बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मे 2024 (16:23 IST)

चोराच्या मागे आपला मोबाईल घेण्यासाठी धावत असलेल्या शिपाईला टोचले इंजेक्शन, रुग्णालयात मृत्यू

महाराष्ट्रातील मुंबई मध्ये ट्रेनने घरी जात असलेल्या शिपाईच मोबाईल एका चोराने हिसकला. यानंतर काँस्टेबल त्याचा पाठलाग करू लागला. काही वेळानंतर आरोपीचे इतर साथीदार देखील आले आणि काँस्टेबल मारायला सुरवात केली. तसेच याच दरम्यान आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी कॉन्स्टेबलला विषारी इंजेक्शन टोचले व कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. 
 
देशाची आर्थिक राजधानी, धावपळीचे दैनंदिन जीवन असणारी मुंबई मध्ये एक वाईट घटना घडली आहे. काही चोरांनी कॉन्स्टेबलाच विषारी इंजेक्शन टोचले आहे ज्यात त्या कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. हे वय वर्ष 30 असलेले काँस्टेबल विशाल पवार हे मुंबई पोलीस सशस्त्र विभागात होते. मिळालेल्या माहितीनुसार या चोरांनी त्यांचा मोबाईल हिसकवाला व त्यानंतर हे काँस्टेबल त्या चोराच्या मागे धावू लागले. चोराच्या साथीदारांनी त्यांना मारहाण करून विषारी इंजेक्शन टोचले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान त्यांच्या अंगात युनिफॉर्म न्हवता ज्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे.  

Edited By- Dhanashri Naik