शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (20:35 IST)

भाजपकडून 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे प्रकाशन

विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे प्रकाशन केले. मुंबई महानगर भागातील कोविड संदर्भात महाविकास आघाडीने खास करून शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश या पुस्तिकेत केल्याचा दावा भाजपने केला आहे. 
 
'मुंबईमध्ये कोविड काळात जो प्रंचड मोठं भ्रष्टाचार झाला आहे. त्या घटनांचं संकलन करुन आमदार अमित साटम यांनी ही पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका भेट म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील पाठवणार आहोत. मुंबईकरांना देखील कोरोनाच्या नावाखाली कोणी आपलं चांगभलं करुन घेतलं हे समजणार आहे.' असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.