मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (15:56 IST)

धक्कादायक: लसीकरण केंद्रात दुसरा डोस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

कोव्हिड लसीकरण केंद्रात एक व्यक्तीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भाग्यनगर कामतघर इथे हा प्रकार घडला. 41 वर्षांच्या सुखदेव महिपती किर्दत यांचा मृत्यू झाला आहे. सुखदेव यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
उपचारासाठी सुखदेव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुखदेव यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. शवविच्छेदनानंतरच नेमकं कारण समजू शकेल अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.