सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (21:55 IST)

Bomb attack दिवाळीत मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बहल्ला करणार, धमकीचा फोन

mumbai police
तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा फोन कंट्रोल रुमला आला होता. हा फोन काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
अंधेरीतील इन्फिनीटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हे तीनही ठिकाण मुंबईतील गर्दीची ठिकाण आहेत. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी तसेच तपासणी केली. हा कॉल कुठून आला होता याची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी या तीनही ठिकाणची तपासणी केली. या ठिकाणी संशयास्पद काहीही सापडलेले नाही. या प्रकरणाचा बीडीडीएस टीम, सीआयएफ टीमने कसून तपास केला. हा कॉल हॉसकॉल डिक्लेर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी आलेल्या या धमकीच्या कॉलमुळे गोंधळ उडाला.
Edited by : Ratnadeep Ranshoor