शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:21 IST)

भरधाव कार डिवाडरवरून विरूद्ध दिशेतील वाहनांवर धडकली, 9 जखमी

car collided head-on with a vehicle in the opposite direction
भिवंडी येथील वडपा परिसरात कारचालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 9 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या 9 जखमींपैकी चार जणांना भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इतर पाच जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि मुंबई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
 
भिवंडी येथील वडपा परिसरात एका कारचालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई-नाशिक हायवेवर वडपा परिसरात ही घटना घडली. सिग्नल न देताच चालकाने कंटेनर वळवला. कंटेनरच्या मागून कार येत होती. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडे गेली. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या विचित्र अपघातात 9 जण जखमी झाले.