गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

मुंबई पोलिसांनी टकटक गँगमधील दोन आरोपींना अटक केली

वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन कारचालकांची लूट करणारी टकटक गँग अखेर गजाआड झाली आहे. मुंबई पोलिसांनी टकटक गँगमधील दोन आरोपींना अटक केली आहे.
 
वाहतूक कोंडीत अडकलेल्या कार हेरून चोरटे काचेवर टक-टक करून कारचालकाचं लक्ष वेधून घ्यायचे, त्यानं काच खाली करताच आरोपी गाडीतील मोबाईल, पर्स अशा वस्तू घेऊन पोबारा करायचे. टकटक गँगचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आलाय.
 
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वसिम बाबू कुरेशी उर्फ वसिम हापुडीया,निलेश अशोक रांजणे या दोन आरोपीना अटक करण्यात केलीय. त्यांच्याकडून मोबाईल फोन, एटीएम कार्ड्स आणि युनिव्हर्सल पास जप्त करण्यात आलेत. टकटक गँगच्या अटकेनं 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांची उकल झाली आहे.