रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (12:29 IST)

मुंबईतील सानपाडा परिसरात गोळीबार, एक जखमी

मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात आरोपीने पाच ते सहा राउंड गोळीबार केला. 

सदर घटना आज सकाळी नवी मुंबईतील सानपाडा डी मार्टच्या संकुलात गोळीबार झाला. या ठिकाणी दोन  अज्ञात आरोपींनी पाच ते सहा राउंड गोळीबार केला.नंतर आरोपींने दुचाकीवरून तिथून पळ काढला.

या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला.

जखमीला जवळच्या रुग्णालयात नेले असून आरोपी कोण होता आणि त्याने गोळीबार का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्याच्याकडे पिस्तूल कुठून आले याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 
Edited By - Priya Dixit