शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (14:11 IST)

आरोपी मिहीर शाह ने मद्यपान केले नसल्याचा फॉरेन्सिक अहवालातून खुलासा

Mumbai BMW Car Accident
वरळी BMW हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीरशाह याचा फॉरेन्सिक अहवाल आला असून त्यात तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिहीरच्या लघवीत आणि रक्तात अल्कोहोलचे अंश चाचणीत आढळले नाही.अशी महिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.  

मिहीर शाह ने वरळीत एका 45 वर्षीय महिलेला उडवलं होत. त्याला अपघाताच्या तीन दिवसांनंतर अटक केली.त्याच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आला असून त्यात अपघाताच्या वेळी मिहीरने मद्यपान केले नसल्याचे समोर आले आहे.  
 
मिहीरने 7 जुलै रोजी वरळीच्या ऑट्रिया मॉल  समोर दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याला बीएमडब्ल्यूने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आरोपी मिहीर असा झाला .पोलिसांनी तीन दिवसां नंतर मिहीर शाहला अटक केली तेव्हा त्याने मद्यप्राशन केल्याचे कबूल केले होते. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे मिहीरचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याचे पत्रक आरटीओला पाठवले 
 
या प्रकरणी मिहीरच्या बाजूला बसलेल्या राजऋषी राजेंद्र सिंह बडावत याला अटक केली असून आता फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आश्चर्य होत आहे. 
Edited by - Priya Dixit