सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (09:33 IST)

मुंबईतील बोरीवली परिसरात मॅनहोल साफ करताना मजुराचा मृत्यू

death
महाराष्ट्रातील उत्तर मुंबईमधील बोरिवली पश्चिम येथे गुरुवारी एका 35 वर्षीय मजुराचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. तसेच महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

ही घटना दुपारी साडेचार वाजता शिंपोली रोडवरील गोखले शाळेजवळ अंबाजी मंदिराजवळ घडली. तसेच सुनील सिद्धार्थ वाखोडे असे मृताचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार "हे मॅनहोल बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका सीवर लाइनचा भाग आहे. जो एका हॉटेल मालकाने साफसफाईसाठी जबरदस्तीने उघडला होता.

त्यासाठी त्याने खाजगी कंत्राटी मजुरांना कामावर ठेवले होते. तसेच ते साफ केले जात असताना वाखोडे त्याच्या आत होते. व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.