रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

बांगलादेशात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवली जात होती, नऊ जणांना अटक

arrest
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. परदेशी नागरिकांच्या अटकेची पुष्टी करताना गुन्हे शाखेचे डीसीपी राजतिलक रोशन म्हणाले की, सर्व आरोपी भारतातून बांगलादेशात अवैधपणे पैसे पाठवत होते.
 
डीसीपी राजतिलक रोशन पुढे म्हणाले, "एकूण नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण अवैधरित्या भारतातून बांगलादेशात पैसे ट्रान्सफर करत होते. यात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो."
 
डीसीपी म्हणाले की, आरोपींनी बनावट आधार कार्ड बनवले होते. भारतात आल्यानंतर त्याने  बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक खाती उघडली होती.