गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मे 2020 (15:23 IST)

मुंबईच्या वांद्रे स्थानकावर शेकडो कामगार पोहोचले, पोलिसांनी केला लाठीमार

मंगळवारी सकाळी शेकडो लोक मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर 'श्रमिक स्पेशल ट्रेन'वर चढण्यासाठी एकत्र झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही विशेष ट्रेन मुंबईहून बिहारकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्मावर पोहोचली होती ज्यात बसण्यासाठी ते लोक ही स्टेशनवर पोहोचले ज्यांनी यासाठी नोंदणी केलेली नव्हती.
 
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, नोंदणी करून स्टेशनवर पोहोचल्यानंतर केवळ एक हजार प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी होती. या प्रकरणात पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागला आणि तेथून गर्दी दूर करण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.