शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (14:51 IST)

मीरा भयंदर मध्ये लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट, 4 आरोपी ताब्यात

लिफ्ट देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची घटना मीरा भायंदर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आत चौघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अंधेरी येथील आपल्या कामाच्या ठिकाणी निघालेला कंडक्टर विरार रेल्वे स्थानकावर येण्यासाठी बसची वाट पाहत होता. चार प्रवाशांसह एक मारुती एर्टिगा कार त्याच्याजवळ थांबली आणि त्याला रेल्वे स्टेशनवर सोडण्याची ऑफर दिली.
पीडितने ऑफर स्वीकारली आणि गाडीत जाऊन बसला.त्याला एका निर्जनस्थळी नेऊन त्याला चाकूचा धाक दाखवून रोख, ब्लूटूथ आणि मोबाईल लुटले आणि नंतर त्याला गाडीच्या बाहेर ढकलून दिले. 

पीडित वाहकाने सदर माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने गाडीवरील लागलेल्या स्टिकरने वाहन शोधून काढले आणि आरोपींपर्यंत पोहोचले आणि 24 तासांच्या आत आरोपीना अटक केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी कार जप्त केली असून आरोपींच्या ताब्यातून चोरीचा माल जप्त केला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 309(6) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,विरार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Edited By - Priya Dixit