शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (21:16 IST)

महानगरपालिका शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, पर्यायाने त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये आणि कारकीर्दीत गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हावी, यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. सीबीएसई व आयसीएसई अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर आता इंटरनॅशनल बॅकॉलॉरेट अर्थात आय. बी. या आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम देखील लवकरच सुरु होणार आहे. या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी आणि आय. बी. बोर्डाचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली आहे.
 
‘आय.बी. बोर्ड’ च्या शाळांमध्ये नर्सरी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये 3 ते 12 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नर्सरी ते 5 वी च्या वर्गांसाठी  आणि 11 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 6 वी ते 10 वी च्या वर्गांसाठी अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. आय. बी. बोर्डची शाळा सुरू करण्याची आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहे. यामुळे येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची आय. बी. बोर्डची एक आणि आय. जी. सी. एस. ई. बोर्डची एक शाळा सुरू होणार आहे.