रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (21:24 IST)

6 डिसेंबर रोजी किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश

मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करीरोड स्टेशन पर्यंतचा सर्व भाग वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगर पर्यंत हद्दीमधील भागात स्थित असणाऱ्या तसेच सायन कोळीवाडा, किंग्जसर्कल, अॅन्टॉपहिल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील ( निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ई. एफ. जी. आय व एच विभाग) सर्व किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या नमुना एफएल- २, एफएल-३, एफएलबीआर-२, सीएल/एफएल/टिओडी ३ नमुना-ई, टिडी-1, सीएल-३, फॉर्म ई-२, एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती) या अनुज्ञप्त्या सोमवार दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी पूर्णतः बंद ठेवण्यात याव्यात व या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.