शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (10:47 IST)

म्हणून तो बाईक चोरी करतो, तपासात उघडल वेगळ कारण

वसईत एका पती आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क बाईक चोरी करत असल्याचे पोलीस तपासातून उघडं झालं आहे. विशेष म्हणजे बायको मिळाल्यानंतर चोरीची बाईक तेथेच सोडून द्याचा, आतापर्यंत त्यांने पाच बाईक चोरल्या  आहे. लहू लक्ष्मण राठोड असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क रस्त्यावर पार्क असलेल्या मोटरसायकल चोरायचा. बायको मिळाली की मोटरसायकल तेथेच ठेवून देत असे. तसेच बाईकमधील पेट्रोल संपलं तरीही बाईक तेथेच ठेवायचा. वसई विरार शहरात एक कॅमेरा शहरासाठी या संकल्पनेतून दुकानदारांनी लावलेल्या कॅमे-यात हा चोरटा कैद झाला आणि माणिकपूर पोलिसांच्या तावडीत सापडला.
 
प्रणेश वर्तक यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस ही बाईक वसईतील दत्ताञय शॉपींग सेंटर समोरुन 17 ऑक्टोबरला रोजी चोरीला गेलेली. वर्तक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीवीच्या आधारे चोरटयाचा फोटो हेरला आणि विशेष टिम नेमून आरोपीला बेडया ठोकल्या. माञ तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. राठोडला फक्त मोटारसायकल डायरेक्ट चालू करण्याची माहिती असल्याने हा स्कुटी न चोरता फक्त मोटारसायकली चोरत असे. माणिकपूर पोलिसांना यांनी पाच बाईक चोरल्याची कबूली राठोडने दिली आहे.