रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 जुलै 2024 (14:40 IST)

ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मारहाण करत ॲसिड फेकण्याची धमकी दिली

rape
ठाणे जिल्ह्यात एका ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मारहाण केली आणि ॲसिड फेकण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि ऑटोरिक्षा चालक हे एकमेकांना ओळखतात. शनिवारी कल्याण- शीळ रोड वर विक्को नाक्याजवळ एका ऑटोरिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला बळजबरी आपल्या ऑटोत बसवले मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आरोपीने मुलीला मारहाण केली. आणि तुझे दुसऱ्या पुरुषाशी प्रेम संबंध असल्याचा आरोप करत तिला धमकावले आणि तिच्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली.

ऑटोरिक्षा चालकाने पहिले त्याचे डोके रिक्षाच्या लोखंडी रॉडवर मारले. तिचे हेडफोन फेकून दिले. नितीश गायकवाड असे आरोपी ऑटोरिक्षा चालकाचे नाव आहे. तिला शारीरिक संबंध करायला बाध्य केले. तिने नकार दिल्यावर आरोपीने मारहाण केली. 

आरोपीच्या विरोधात मुलीने तक्रार नोंदवली असून मानपाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
 
Edited by - Priya Dixit