रविवार, 29 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2024 (18:11 IST)

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

arrest
28  वर्षांपूर्वी मुंबईत घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.तेव्हापासून आरोपी फरार होता. आता या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून आरोपीला अटक केली आहे. 

ठाण्यात 28 वर्षांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.या गुन्ह्यामध्ये फरारअसलेल्या दरोडेखोराला 28 वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. ईश्वरलाल सोळंकी असे या आरोपीचे नाव आहे. त्याला दहिसर चौकातील पेणकर पाडातून अटक केली आहे. 

आरोपीने 1996 साली मीरा भाईंदर परिसरात काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी बस स्टॉप वर लुटले होते. याने त्यांच्या पर्स, बॅग लुटल्या. या प्रकरणी पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या. या आरोपीवर कश्मिरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र हा आरोपी ईश्वरलाल पोलिसांना चकवा देत होता.पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्तचर माहितीसह अनेक सुगावावर काम केले.दरम्यान,आरोपी हा मुंबईतील मालाड, मालवणी परिसरात  राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.आरोपी दहिसर चेक पॉईंटवरून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर आरोपीने गुजरात आणि मुंबईत देखील गुन्हे असल्याचे उघडकीस आले. 
 
Edited by - Priya Dixit