रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:48 IST)

बाप्परे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक

मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कार्यकारी अभियंता एम. वाय शंखपाळे, शाखा अभियंता महेंद्र भानुदास ठाकूर आणि लघु टंकलेखक संतोष अरविंद शिर्के अशी या तिघांची नावे आहेत. सात लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच आधीच घेतल्यानंतर उर्वरित ९० हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी या कार्यालयातून पोलिसांनी १३ लाख १५ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. 
 
ही कारवाई अंधेरी येथील भवन्स कॉलेजसमोरील दादाभाई मार्ग, उत्तर मुंबई प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरात शंकपाळे हे कार्यकारी अभियंता, महेंद्र ठाकूर हे शाखा अभियंता, तर संतोष शिर्के हे लघु टंकलेखक म्हणून कार्यरत आहेत.