गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (18:02 IST)

धारावी तरुण हत्याकांड प्रकरणात आणखी दोघांना अटक

arrest
मुंबईतील धारावी परिसरात रविवारी एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या पूर्वी दोघांना अटक केली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद वैश्य नावाच्या तरुणावर हल्ला करत काही जणांनी मारहाण केली. दोन गटातील भांडण्यात त्याने मध्यस्थी केल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या  घटनेनंतर रविवारी गुन्हा दाखल केला आहे. आणि या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. आम्ही या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे प्रकरण धारावीतील राजीव नगरचे आहे. दोन गटातील होणाऱ्या भांडणाला रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अरविंद वैश्य नावाच्या 26 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्याची हत्या केली. अरविंदचा भावाच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एका गटातील अल्लू नावाच्या तरुणाचे वाद दुसऱ्या गटातील सिद्धेश नावाच्या तरुणाशी झाले.  

अल्लू आणि त्याच्या गटातील काही लोकांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरु केले. मध्यस्थी करायला अरविंद वैश्य आला. रागाच्या भरात अल्लूने अरविंदला मारहाण केली. या बाबत तक्रार करण्यासाठी अरविंद धारावी पोलीस ठाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अल्लूचे काही मित्र गेले आणि पोलिसांसमोर त्यांनी अरविंदला तक्रार परत घेण्यासाठी धमकावले.  

नंतर दोन पोलिसांसह अरविंदाला घटनास्थळी पाठवण्यात आले. तो तेथे आल्यावर अल्लूच्या गटातील काही लोकांनी पोलिसांसमोर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी अल्लूला ताब्यात घेतले इतर पसार झाले. नंतर एकाला आणखी ताब्यात घेतले बाकीचे पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या अरविंदला तातडीनं रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आणखी आरोपींना अटक केली आहे. 
Edited By- Priya Dixit