गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (12:35 IST)

केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत, मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुन्हा अडचणीत आले आहे.  त्यांच्यावर अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सलियन यांच्या मृत्यूप्रकरणी खोटे आरोप केल्या प्रकरणी यांच्याविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे . राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे . नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असा आरोप केला होता की दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते. असा आरोप त्यांनी केला.नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे हे दिशा सालियनसोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत वारंवार बोलत आहेत.
 
दिशा सालियनच्या पालकांनीही आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर आदर वाढवण्याबद्दल आणि त्यावर राजकारण केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींबाबत मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. यानंतर महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल मालवणी पोलीस ठाण्यातून मागवला होता. त्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा  समावेश आहे. शवविच्छेद अहवालामध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा उल्लेख नाही. यानंतर महिला आयोगाने नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर कारवाई करत मालवणी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.