बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:40 IST)

आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, अंतरंगही भगवेच : उध्दव ठाकरे

मी डरणारा नाही तर म  लढणारा आहे हे लक्षात असू देत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटे पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. 2014 मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवेच आहे असे उद्धव यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपला विचाराचे आहे की तुमचे काय काय उघड झाले? युती तर तुम्ही 2014 लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावे ठेवत आहात का? असे उद्धव यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना यांच्यावरुन उद्धव यांनी अभिवादन केले. सत्काराला उत्तर देताना मुख्यमत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली आणि काँग्रेसराष्ट्रवादी यांच्याबरोबर आघाडी करणामागचे कारण स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आज हक्काने माझ्या शिवसैनिकांचा
पहिला सत्कार स्वीकारला. या सत्कार सोहळच्यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.