Last Modified: कानपूर , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:41 IST)
ठाकरेंवर देशद्रोहाचा खटला चालवा - सपा
राज ठाकरे यांनी अमराठींवर केलेले आरोप हे देशाच्या सुरक्षिततेसाठी घातक असल्याचे सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. कानपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे यांच्या विरोधात सापातर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी येथे राज यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.ठाकरे यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी हे कार्यकर्ते करत आहेत.