शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:48 IST)

पोलिस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला राज

उत्तर भारतीयांविरोधात उघड विरोधाचा पवित्रा घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मंगळवारी मुंबईचे पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त झालेल्या स्वागत समारंभाला उपस्थित होते.

श्री. जाधव यांची कन्या कीर्ती हिच्या लग्नानिमित्त गोरेगाव येथे हा कार्यक्रम झाला. एकीकडे राज यांना अटकेची जोरदार मागणी असताना ते मात्र, श्री. जाधव यांच्या कन्येच्या लग्नाला उपस्थिती लावून आले. सुटाबुटात या रिसेप्शला उपस्थित राहिलेल्या राज यांच्याबरोबर त्यांची पत्नी शर्मिला याही होत्या.

मुंबईत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सहआयुक्त के. एल. प्रसाद हाताळत आहेत.