मनोज तिवारीच्या घरावर हल्ला
भोजपूरी चित्रपट अभिनेता मनोज तिवारी यांच्या अंधेरी चार बंगला भागातील घरावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.यात तिवारी यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चारच्या दरम्यान त्यांच्या घरावर दगडफेक केली.दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याने तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दोनदिवसांपुर्वीच त्यांनी आपल्याला मुंबईत भितीच्या सावटाखाली वावरावे लागत असल्याचे वक्तव्य केले होते.