शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:43 IST)

राज ठाकरे देशद्रोही - लालूप्रसाद यादव

केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना देशद्गोही असे संबोधले आहे. मुंबईत उत्तर भारतीयांना विरोध म्हणजे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लालू प्रसाद यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेतली. लोकांनी संयम पाळावा व फूट पाडणाऱ्या शक्तींना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले.

अमिताभ बच्चन यांच्या मातृभूमी प्रेमावर टीका केल्याबद्दल आणि बच्चन यांच्या घरावर कथित बाटल्या फेकल्याप्रकरणी त्यांनी राज समर्थकांवर टीका केली. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला.

राज यांचे विधान व त्यांच्या समर्थकांनी घातलेला हैदोस हा देशाचे विभाजन करण्याचा डाव असून तो देशद्रोह असल्याचे लालू यांनी म्हटले. देशापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही, असेही त्यांनी बजावले.