जया यांनी आपल्याकडून जमीन घ्यावी- राज
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी कोहीनूर मिलची जागा बाजार भावाप्रमाणे विकत घ्यावी, अशी उलट प्रतिक्रिया महाराष्ट्र नवविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्या वडीलांप्रमाणे असून त्यांच्या कुटूंबाशिवाय मी दुसर्या कोणत्याही ठाकरेंना ओळखत नसल्याचे काल जया बच्चन यांनी म्हटले होते. जया बच्चन यांची सून ऐश्वर्या रॉय हिच्या नावाने मुलींसाठी शाळा उघडण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या मिलची जागा दान म्हणून द्यावी अशी मागणी केली होती.