शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:44 IST)

त्यांना नुकसान भरपाई मिळेल- विलासराव

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ज्या टॅक्सीवाले आणि विक्रेत्यांना मारहाण केली त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

अमराठी भाषकांनी मुंबईत आपले शक्ती प्रदर्शन थांबवावे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्यात आली होती.

यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही किरकोळ विक्रेते आणि टॅक्सीचालकांना झोडपले होते.

नुकसान झालेल्या प्रत्येकाला भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.