Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:39 IST)
मनसेचे नेते शिशिर शिंदेंना अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिशिर शिंदे यांना पोलिसांनी अटक केल्याने मुंबईत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. मनसेने या वृत्ताला दुजोरा दिला असून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी पोलिसांनी विविध भागांतून मनसेच्या 73 जणांना अटक केली आहे.