रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अपहरणकर्त्याची लज्जास्पद मागणी, नवरा पाहिजे तर सेक्स करा...

खंडणी म्हणून पैसा, दागिन्याची मागणी तर ऐकली असेल पण एका अपहरणकर्त्याने एका माणसाचे अपहरण करून विचित्र आणि लज्जास्पद मागणी केली.  
 
नवरा घरी न आल्यामुळे एका महिलेने पोलिस ठाण्यात जाऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. परंतू प्रकरणात तेव्हा विचित्र वळण आलं जेव्हा अपहरणकर्त्याने नवर्‍याला सोडण्यासाठी पत्नीकडे सेक्सची मागणी ठेवली.
सूत्रांप्रमाणे हे प्रकरण फरिदाबाद येथील छाइंसा पोलिस ठाणा क्षेत्राचं आहे. महिलेला अपहरणकर्त्याने मागणी न मानल्यास पतीचा खून करण्याची धमकी दिली आहे. 28 जून रोजी महिलेला फोन आला की तिच्या पतीचे अपहरण केले असून तिने सेक्सची मागणी मान्य केली नाही तर तो पतीचा खून करेल.
 
आरोपी सतत महिलेसह शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकत असून फोनवर गैरवर्तन करत आहे. हे प्रकरण दाखल करून पोलिस गुन्हेगाराचा शोध घेत आहे.