शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :दिल्ली , शुक्रवार, 27 मे 2016 (15:44 IST)

अमेरिकेने पाकिस्तानला भरला दम

तुमच्या देशात सुरु असलेल्या दहशवादी संघटनांवर लक्ष ठेवा, मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहकार्य करा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला भरला आहे.

मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला जगाला हादरवणारा होता. त्यामुळे या तपासात भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करा, अशी विनंती आम्ही सातत्याने पाकिस्तान सरकारला करत आहे” असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईवरील हल्ला हा अत्यंत भयानक होता. त्यामुळे पीडितांना न्याय मिळणं आवश्यक आहे, असंही त्यांनी नमूद केलं.