शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By नितिन फलटणकर|

आता आयुर्वेदिक औषधांचेही पेटंट आवश्यक

वर्तमान परिस्थितीत आयुर्वेदिक औषधांचे पेटंट आवश्यक असल्याचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की जे डॉक्टर आयुर्वेदिक ज्ञानाशिवाय डॉक्टरी सुरु करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याचीही आवश्यकता आहे.

अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसच्या हीरक जयंती समारंभाचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती बोलत होत्या. मानव जीवन अनमोल असल्यामुळे वेदांची नोंद होणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्याला आयुर्वेदाच्या शिक्षण आणि प्रशिक्षणावर लक्षद्यायला हवे.

त्या पुढे म्हणाल्या की आयुर्वेदिक औषधांचे पेटंट करणे यासाठी ही आवश्यक आहे कारण असे करण्यामुळेच हे भारताचे ज्ञान असल्याचे मानले जाईल. म्हणून या दिशेने प्रयत्न केले गेले पाहिजे. आयुर्वेदाचे ज्ञान आज विखरलेले आहे ते एकत्रित केले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.