मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (10:24 IST)

काश्मिर हा भारता आहे - स्वराज

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, असाच तो  कायम राहणार आहे. काश्मीर बळकावण्याचं स्वप्न कोणीही पाहू नये, अशा कठोर शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानलाइशारा दिला आहे. सुषमा स्वराज यांनी 71 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानचे कान ओढले आहेत.

दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी असतात. दहशतवादाला पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक असतो, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला.  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं, असंही स्वराज  म्हणाल्या आहेत.

विशेष म्हणजे, सुषमा स्वराज यांनी हिंदीतून भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी मानवता, शांती आणि गरिबीवर भाष्य केलं आहे . त्यानंतर त्यांनी जागतिक आणि देशाबाहेरील दहशतवादाकडे मोर्चावर बोलणे सुरु केले. काश्मीरला भारत भूमीपासून कोण आणि  कुणीही वेगळ करू शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणारच आहे. पाकिस्तानने काश्मीर मिळवण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे असा सणसणीत टोला स्वराज यांनी पाकला लगावला आहे.स्वराज यांनी अनेक गोष्टी पाकिस्थान आणि त्याच्या निकटवर्तीय देशांना समजाऊन सांगितल्या आहेत. त्यामध्ये जराही हुशारी केली तर सर्व गोष्टी बिघडू शकतात असा इशारा स्वराज यांनी दिला आहे.