शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 मे 2016 (13:48 IST)

खडसे यांना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून अभय

राज्याचे महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कुख्यात दाऊद इब्राहीम याच्याशी संभाषण केल्याच्या ‘आप’च्या प्रीती मेनन यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 
 
आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रिती शर्मा मेनन यांनी एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असून, त्यांनी फोनवरही चर्चा केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र हे सर्व आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावत, मेनन यांना न्यायालयात खेचण्याची धमकी दिली.मेनन यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. चौकशीदरम्यान आप दावा करत असलेल्या सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत खडसेंच्या फोनवरून कॉल गेला नाही आणि आलाही नाही, असा खुलासा गुन्हे शाखेचे मुंबई सहाय्यक आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केला आहे. 
 
निराधार आरोपासाठी प्रीती मेनन प्रसिद्ध- खडसे 
आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन या निराधार आरोपासाठी प्रसिद्ध असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे स्पष्ट केले आहे. मेनन यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर गंभीर आरोप केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, दाऊदची पत्नी महजाबीन शेखनी खडसेंना फोन केला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती.या प्रकरणात संभाव्य राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी खडसे यांना मंत्रिपदावरून दूर करून त्यांची नि:पक्षपातपणे चौकशी करावी, अशी मागणीही शर्मा यांनी केली.आज बंगळूर येथे वृत्तसंस्थेशी बोलताना खडसे म्हणाले,प्रीती मेनन-शर्मा यांनी याआधीही माझ्याविरुद्ध आणि महाराष्ट्र सरकारविरुद्ध आरोप केले असून ते सारे निराधार आहेत. 
 
त्यांच्यावर यापूर्वीच पाच ते सहा अब्रूनुकसानीचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त अच्युतेंद्र कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरात माझ्या फोनवरून कोणताही आंतरराष्ट्रीय कॉल केलेला किंवा आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर यावरही त्यांचे समाधान झाले नसेल तर त्यांनी न्यायालयात जावे. तसेच त्यांचे नाव कोणालाही माहिती नसून माझे नाव वापरुन त्या प्रसिद्धीसाठी हा प्रकार करत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. तसेच मी ही त्यांना न्यायालयात खेचू शकतो, असेही खडसे म्हणाले.