1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2016 (10:57 IST)

गोळ्या फिल्मी नाही रे सलमान - ठाकरे

पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेल्या सलमानवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी चांगला समाचार घेतला आहे. या  सलमानची   ट्युबलाईट मधेमधे पेटते . त्यामुळे त्याला जास्त बघु नका असे भाष्य केले आहे  मनसे प्रमुख  राज ठाकरे  यांनी सलमान खानची शाळा घेतली आहे. एका खासगी वाहिनीला राज आयांनी मुलाखत दिली आहे.  राज यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन करणाऱ्या सलमानचे कान पुन्हा टोचले आहेत.. सीमेवर तैनात जवान छातीवर झेलत असणाऱ्या गोळ्या या फिल्मी नसतात,असे सांगत सलमानला त्यांनी फटकारले आहे . ‘भारतीय जवानांना गोळ्या लागतात त्या फिल्मी नसतात, तर त्या खऱ्या असतात आणि सलमान खानला ज्या गोळ्या लागतात त्या खोट्या असतात.’ असे राज यांनी म्हटले.त्यामुळे पुनः एकदा राज यांनी सलमानला फटकारले असून भारतीय असणे महत्वाचे आहे असे नमूद केले आहे. ठाकरे यांच्या मनसे पक्षामुळे आता संपूर्ण हिंदी चित्रपट त्यातही पाकीस्थानी कलाकार असलेल्या चित्रपट अडचणीत आहेत. करण जोहर हा राज यांना विनवणी करत आहे की त्याचा चित्रपटाला विरोध नसू नये.