1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 जून 2011 (16:38 IST)

द्रमुक नेते मारन पंतप्रधानांच्या भेटीला!

केंद्रीय मंत्री व द्रमुक नेते दयानिधी मारन यांनी आज (गुरुवारी) पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

टू-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणात मारन यांचे नाव चर्चिण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीसला महत्त्व आहे. टू-जी स्पेक्ट्रमचे परवाने देण्यात आले तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या कार्यकालादरम्यान मारन दूरसंचार मंत्री होते.

शिवाय लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार आहे, यामुळेही मारन व पंतप्रधान यांच्या दरम्यान या भेटी काय चर्चा होते ते महत्त्वाचे आहे.