भारताचा सार्क परिषदेवर बहिष्कार
पाकिस्तानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्थान येथे इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क परिषदेला भारत उपस्थित राहणार नाही अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये सार्क देशांची परिषद आयोजित होत आहे. तर भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जाते आहे. एक देस सातत्याने जगातील आणि शेजारील देशासोबत सबंध आणि वातवरण खराब करत आहे त्यामुळे आम्ही येणार आणि असे भारताने सार्कच्या अध्यक्षांना कळविले आहे.
भारतासोबतच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला गैरहजेर राहणार आहे.त्यामुळे आशिया खंडातील भारताची ताकद आणि मुत्सदेगिरी दिसून आली असून पाकिस्थानला हा मोठा धक्का असणार आहे.