सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

मंदीराने माफी मागितली

एका खाजगी वाहीनीवर सुरू असलेल्या क्रिकेटच्या कार्यक्रमादरम्यान मंदिरा बेदीने राष्ट्रध्वज छापलेली साडी घातल्याने माफी मागितली आहे. या साडीवर भारतासमवेत 16 देशांचे राष्ट्रध्वज छापलेले होते. व त्यात भारताचा ध्वज गुडघ्याखाली घातल्याने देशभरातुन नाराजी प्रकट करण्यात येत आहे.

सोन मँक्स वर सुरू असलेल्या एक्ट्रा इनींगमध्ये तिने काल ही साडी घातली होती. त्यानंतर तिला तिची चुक लक्षात आली व तिने लगेत साडी बदलली. त्या कार्यक्रमात तिने सांगीतले की माझ्या नवर्‍याने सांगितले की भारताचा ध्वज असलेली साडी घातल्याने काही लोकांचा भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे मी ती साडी लगेच बदलली. माझ्याकडून नकळत ही चुक झाल्यामुळे मी सर्वांची मागते.

या कार्यक्रमात तिच्या बरोबर सुत्रसंचालक चारू शर्मा इंग्लंडचा माजी कर्णधार टोनी ग्रेग, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाही उपस्थित होते. त्या ती म्हणाली की मला भारतीय होण्याचा अभिमान आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात माझा कोणताही हेतु नव्हता.

यामुळे जर कोणाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मला माफ करा. मंदीराने कार्यक्रमाच्या सुरूवातीला घातलेल्या या साडीत भारताचा झेंडा हा गुडघ्याखाली होता. ध्वजाच्या संहिचे नुसार कमरेच्या खाली ध्वज घालणे हा तिरंग्याचा अपमान समजला जातो.