Last Modified: दिल्ली , बुधवार, 11 मे 2016 (11:02 IST)
मोदींची पदवी खरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी खरी असून यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. पदवीमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. नरेंद्र मोदींच्या पदवीशी संबंधित सर्व आवश्यक रेकॉर्ड आपल्याकडे असून, मोदींच्या पदवीवर १९७९ चा उल्लेख ही आपल्याकडून झालेली चूक असल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे. आम्ही आमचे रेकॉर्ड तपासले.
नरेंद्र मोदींची पदवी ही पूर्णपणे खरी आहे. त्यांनी १९७८ साली परीक्षा दिली आणि त्यांना १९७९ साली पदवी मिळाली असे दिल्ली विद्यापीठाचे रजिस्टार तरुण दास यांनी सांगितले. आपचे नेते मोदींची पदवी तपासण्यासाठी दिल्ली विद्यापीठात गेले होते. त्यानंतर काहीवेळाने दिल्ली विद्यापीठाने हा खुलासा केला. मोदींना १९७८ सालीच बीएची पदवी मिळाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.