1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: अलवर , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (16:34 IST)

रामदेव बाबांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर

योग गुरू बाबा रामदेव आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. स्वत:  बाबा रामदेवांनी पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे सांगितले. मात्र, आपण चुकीचे बोलून गेल्याचे रामदेव बाबांच्या लक्षात आले. 

बाबा रामदेव अलवर मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौर्‍यावर होते. यावेळी, संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी चंदनाथ आणि बाबा रामदेव स्टेजवर शेजारी शेजारी बसलेले असले होते. त्यांच्या समोरचा माईक बंद होता. पण, अचानक बाबा रामदेवांना समोर माईक असल्याचे ध्यानात आले. म्हणून, खुसपुसत त्यांनी महंत यांना माईक सुरु झाल्यावर धनाबद्दल चकार शब्द न काढण्याविषयी इशारा दिला. एवढेच नव्हे तर, ' बोलणे थांबव, तू मूर्ख आहेस' अशा शब्दात रामदेवांनी महंत यांना चांगलेच खडसावले. याबद्दल महंत यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी मौन धारण केली.

दरम्यान, राजस्थानातील अलवर या मतदारसंघात 24 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने मात्र तात्काळ मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत रामदेव आणि महंत यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.