1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (12:09 IST)

'सलमान खानला कोठडीत पाठवणे सोपे नाही'

हिट ऍड रन केसमध्ये मागील 13 वर्षांपासून सुरू असलेल्या ट्विस्टला आता पूर्णविराम लागला आहे. सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा ठोठावावी, यावर सरकारी पक्ष युक्तिवाद करेल. त्यानंतर बचाव पक्षही आपली बाजू मांडेल. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालय सलमानला शिक्षा सुनावेल. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सलमान दोषी आढळल्यास त्याला किती शिक्षा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही घटना २८ सप्टेंबर २००२ रोजी घडली. आता सलमान दोषी ठरल्यामुळे इंडस्ट्रीला फार मोठा झटका लागणार आहे. 
 
इंडस्ट्रीचे एक्सपर्ट अमोद मेहरा यांनी सांगितले की सलमान खान शिक्षा होईल असे कोणी विचारही करू शकत नाही. त्यांनी म्हटले की  'सलमानच्या प्रकरणात कुठल्याही प्रकारची काळजीची बाब नाही आहे. देशाचा कायदा असा आहे की बुधवारी सलमनाला शिक्षा झाल्यानंतर देखील जामिनाचे विकल्प मिळेल.'
 
दुसरे एक्सपर्ट विनोद मिरानी यांनी म्हटले की जर सलमानच्या बाजूने निर्णय नाही आला तर त्याच्याजवळ वरच्या न्यायालयात अपील करण्याचा विकल्प आहे. 2002मध्ये बांद्रात झालेल्या या घटनेत सतत कोर्टात खटला सुरू होता.   
 
येत आहे मोठे चित्रपट  
महत्त्वाचे म्हणजे कोर्टाच्या निर्णयाचा प्रभाव सलमानच्या चित्रपटांवर पडणार आहे. या वर्षी त्याचे मोठे चित्रपट येणार आहे. बंजरंगी भाई जान आणि प्रेम रतन धन पायो.. दोन्ही पूर्ण होणार आहे. या दोन्ही चित्रपटांचा खर्च किमान 200 कोटी रुपयांजवळ आहे. त्याशिवाय नो एंट्री आणि किकचे सीक्वेल पण लाइनवर आहे. मिरानी यांनी म्हटले की देशाचा कायदा असा आहे की कुणालाही तुरुंगात पाठवण्यात बराच वेळ लागतो. 10 वर्षेही लागले तर काही आश्चर्याची बाब नाही.  
 
संजय दत्तच्या प्रकरणाचे उदाहरण देत मेहरा यांनी म्हटले की त्याला तुरुंगात पाठवण्यात बरेच वर्ष लागले. सलमानसोबतही असेच होईल.  असे ही शक्य आहे की जेव्हा सलमान कोठडीत जाईल तेव्हा त्याच्या वयाचे 60 वर्ष देखील पूर्ण झाले असतील.