शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: कुल्लू , सोमवार, 16 मे 2022 (18:37 IST)

हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळली, 4 पर्यटकांचा मृत्यू

accident
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. बंजार येथील घियागीजवळ दिल्लीहून आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला आहे. महामार्ग-305 वरून सुमारे 200 मीटर खाली घियागी दरीत कार कोसळली. यात चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेसह तीन पर्यटकांचा समावेश आहे.
 
काल रात्री उशिरा हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून 2 जखमी महिला पर्यटकांना उपचारासाठी बंजार येथे नेले. आस्था भंडारी (26), साक्षी (27) अशी जखमींची नावे आहेत, ज्या दिल्लीच्या रहिवासी असून त्यांच्यावर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांचे पथक मृतदेह बाहेर काढण्यात व्यस्त आहे.