1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

500 रुपयात तुरुंगात सहल

संगारेड्डी- तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यातील वसाहती कालखंडातील तुरुंग बघायला येणारे पर्यटक आता 500 रुपये देऊन एक दिवस तुरुंगात राहून तेथील जीवन अनुभव करू शकतात. संगारेड्डी येथे 220 वर्ष जुनी सेंट्रल जेल आहे, जे आता संग्रहालय रूपांतरित झाले आहे. आता येथील कारागार विभागाने पर्यटकांना नवीन अनुभव देण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली आहे.
आता पर्यटक 500 रुपये देऊन 24 तास तुरुंगात घालवू शकतो. याचे नाव ‘फील द जेल’ असे ठेवले गेले आहे. तुरुंगात राहणार्‍यांना घालण्यासाठी खादीचे कपडे दिले जाती. जेवायला तुरुंगाप्रमाणेच भांडी आणि मेन्यूमध्ये चहा आणि जेवण देण्यात येईल. जेवण्यात वरण, भात, पोळ्या आणि कढी देण्यात येईल.
 
येथे थांबणार्‍यांकडून कैदीप्रमाणे काम करण्यात येणार नाही तरी बेरक स्वच्छ करण्याची जबाबदारी असेल. तसेच ते झाडं पेरायला स्वतंत्र असतील. येथील उप अधीक्षक लक्ष्मी नरसिम्हा यांच्यानुसार आतापर्यंत एकाही पर्यटकाने या सुविधेचा लाभ घेतलेला नाही.