रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (19:41 IST)

अहमदाबाद मध्ये अग्निकांड झाल्यामुळे 80 झोपड्या जळाल्या

अहमदाबाद. झोपडपट्टीत आग लागल्यामुळे 80 झोपडपट्टय़ा जळून खाक झाल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही अपघाताचे वृत्त नाही. आग लागताच पोलिसांनी परिसरातील लोकांना बाहेर काढले होते.
 
आनंदनगर येथील झोपडपट्टीत पहाटे नऊच्या सुमारास आग लागली आणि जोरदार वाऱ्यामुळे ती आग पसरली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन विभागाचे प्रमुख जयेश खडिया म्हणाले की, आगीनंतर तेथे सुमारे चार सिलिंडर फाटले.
ते म्हणाले की 80 पेक्षा जास्त झोपडपट्टय़ा जळून खाक झाल्या आहेत. कुठल्याही जीवितहानीची बातमी नाही.
खडिया म्हणाले की, अग्निशमन दलाची सुमारे 22 वाहने घटनास्थळी रवाना झाली आणि सुमारे तीन तासांत आग आटोक्यात आणली. त्यांनी सांगितले की झोपडपट्टीतील अरुंद रस्त्यांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात वेळ लागला.
ते म्हणाले की,आगीवर विजय मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीत जळालेल्या झोपडपट्ट्यांमध्ये पाठविण्यात आले आणि आग पूर्णपणे विझविण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.