शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (17:46 IST)

Pillar for the idol of Lord Rama श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शिळा अयोध्येत

pillar for the idol
अयोध्येत जर भव्य राम मंदिर तयार होत असेल तर श्रीरामाचं सासर असलेल्या नेपाळमधील जनकपूरमधून काहीतरी योगदान स्वीकारलं गेलं पाहिजे, या विचाराने शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरण्यात आल्या होत्या. पूजनानंतर दोन्ही शिळा ट्रकने रस्त्याने अयोध्येला पाठवण्यात आल्या आहेत. या खडकांना पाहण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी वाटेतही लोक जमले आहेत. एका दगडाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या दगडाचे वजन 14 टन आहे. म्हणजेच दोन्ही खडकांचे वजन 40 टन आहे. 
 
अयोध्या : शाळिग्राम शिळा अयोध्येला (Ayodhya)पोहोचल्या आहेत. मात्र अजून हे निश्चित झालेलं नाही ही राम ललाची मूर्ती याच शिळेपासून बनेल की नाही. मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं की, मूर्तीतज्ञ याचं परीक्षण करुन याच्या उपयुक्ततेविषयी आपलं मत मांडतील. परीक्षणातून हे उघड होईल की शिळेतला आतला भाग कसा आहे.
 
शिळांचं होणार परीक्षण
चंतप राय म्हणाले की, शक्यतो या शाळिग्रामापासूनच रामललाची मूर्ती बनवण्याच्या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र काही अडचण जाणवली तर पर्याय म्हणून ओडिसा आणि कर्नाटकातूनही शिळा मागवण्यात येतील. या सगळ्या शिळांचं परीक्षण दोन महिन्यांमध्ये करण्यात येईल. परीक्षणाच्या अहवालानुसार रामललाच्या मूर्तीच्या निर्मितीविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.