मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता दारू पिणार्‍यांसाठी आधार कार्ड सक्तीचे

aadhar card for hard drink
आता सर्वच क्षेत्रात आधार येत असताना, दारू पिणारे सुद्धा मागे राहणार नाहीत. आता दारू जर विकत घ्यायची असेल तर तुम्हाला आधार असणे गरजेचे आहे. हो हे खर आहे.  
 
तेलंगणामध्ये उत्पादन शुल्क विभागाने पबमधून दारू विकत घेण्यासाठी आता ओळखपत्र सक्तीचं केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर दारू हवी असेल तर आधार गरजेचा आहे. यामध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा 17 वर्षांच्याच विद्यार्थ्यांने खून केल्याची घटना घडली समोर आली होती.  या घटनेनंतर पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू सरकारने विक्रीवर बंदी केली आहे. तर दुसरीकडे 21 वर्षांखालील मुलामुलींना पबमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.तेलंगाना ने असा निर्णय घेतल्याने आता इतर राज्य सुद्धा अशी सक्ती करणार आहे.