गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2017 (12:40 IST)

विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर सलमान खान,राहुल गांधी

Agra University Publishes Marksheets With Salman
आग्रा युनिर्व्हसिटीने बीएच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर अभिनेता सलमान खानचा फोटो छापुन आला आहे. इतकंच नव्हे तर दुसऱ्या एका मार्कशीटवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा फोटो छापण्यात आलाय.

जेव्हा विद्यार्थ्यांच्या मार्कशीट तपासल्या जात असताना सलमान आणि राहुल गांधींचे फोटो असलेल्या मार्कशीट समोर आल्या. मार्कशीटच्या छपाचे काम एका प्रायव्हेट एजन्सीला देण्यात आलेय. सलमान खान आणि राहुल गांधीचा फोटो असलेली मार्कशीट पाहून चर्चेला एकच उधाण आले. ज्या मार्कशीटवर सलमानचा फोटो छापण्यात आला होता ती अमृता सिंह मेमोरियल डिग्री कॉलेज अलीगडच्या विद्यार्थ्याची होती.

या विद्यार्थ्याला परीक्षेत ३५ टक्के मार्क मिळाले आहेत.