गांधी कुटुंबानं स्पष्टीकरण द्यावे मुख्यमंत्र्यांची मागणी
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणी दोषींना शिक्षाही सुनावली आहे. या प्रकरणातील दलाल ख्रिश्चयन मिशेल याच्याकडे केलेल्या चौकशीत, त्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) न्यायालयात दिली आहे. यावर आता गांधी कुटुंबानं स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ख्रिश्चयन मिशेल हा महत्वाचा माणूस आहे. आता त्याच्या चौकशीत या घोटाळ्यातील अनेकांची ओळख पुढे येऊ लागली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.