शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नासाच्या कॅलेंडरमध्ये भारतीय कन्येचं चित्र कव्हरवर; महाराष्ट्राच्या मुलांनाही मानाचे स्थान

वॉशिंग्टन- नासाच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये यंदा भारतीय मुलांनी मानाचे स्थान पटकावले आहे. नासाने नववर्षासाठी NASA 2019 Calendar लॉन्च केले. या कॅलेंडरच्या कव्हर पेजवर भारतीय कन्येने रेखाटलेले चित्र पाहायला मिळत आहे.
 
मुख्यपृष्ठावर जागा पटकावणार्‍या 9 वषीर्य मुलीचे नाव दीपशिखा असे असून ती उत्तर प्रदेशातील आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्रं आहेत. ज्यातून दोन चित्र महाराष्ट्रातील मुलांनी रेखाटले आहेत. 10 वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. तसेच तमिळनाडूत राहणाऱ्या 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. 
 
इंद्रयुद्ध आणि श्रीहन यांनी तयार केलेले चित्र लिव्हींग अॅण्ड वर्किंग इन स्पेस या संकल्पनेवर आधारीत आहे. थेमुकिलिमन याचे चित्र स्पेस फूड या संकल्पनेवर आधारीत आहे. या कॅलेंडरवर वर्षाच्या एकूण 12 महिन्यांच्या पृष्ठांवर मुलांनी तयार केलेल्या कलेचा अविष्कार पाहायला मिळत आहे. 
 
आतराळ विज्ञान ही संकल्पा घेऊन नासाने कॅलेंडर निर्मिती केली आहे. नासाप्रमाणे मुलांना आंतराळ या विषयाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी आणि अंतराळवीरांचं आयुष्य, तसेच आंतराळ वैज्ञानिक, अभियंते, प्रयोग आदिंसाठी मुलांना प्रोत्साहीत करणे या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे.